नांदगांव येथील वैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयात नवगतांचे स्व:गत करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड - जयकुमार कासलीवाल हे ९२ वर्षाचे आजोबा तसेच नांदगांव शहरातील ज्येष्ठ पञाकर, पालक,व शिक्षक,डाॅक्टर आदीं उपस्थित होते. दरम्यान व्ही. जे. हायस्कूल मध्ये पुर्वी ११ वी बोर्डाची परीक्षा दिलेले ९२ वर्ष वयाचे,ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड - जयकुमार कासलीवाल यांनी विद्यालयातील चुमुकल्यांचे उत्सहात स्वा:गत केले, यावेळी प्रमुख पाहुने म्हणून बोलताना ॲड. कासलीवाल म्हणाले की सन १९५३ मध्ये दक्षिण हिंदुस्तान २५०० किमी सायकल प्रवास करुन निरोगी जीवनाचा संदेश दिला.
ते पुढे म्हणाले व्हि.जे. माध्यमिक विद्यालय नांदगांव या शाळेच्या प्रांगणात माझे जिवित्त्व घडले, लोकसेवा समाज सेवा हे जो पर्यंत शाळेत संस्कार युक्त पोहचले जातात मि व्हि.जे माध्यमिक विद्यालय हे विद्यालय १९५० मध्ये शाळा सोडली ११ वि बोर्डाची परीक्षा केंद्र पेठे हायस्कुल नाशिक येथे प्रथम आलो.
या शाळेने मला संस्कार दिले, म्हणून माझी प्रगती झाली मि राज्य व आर्थ शास्ञाचा विध्यर्थी होतो, व माझे किर्तीकर यांचे हस्ते मानाचा अंक मिळाला होता. १९५४ ला पुणे येथे लाँ कॉलेजला प्रवेश घेतला. खेड्यातल्या मुलांना पदवी परीक्षा व ओपन मेरीट व काँलरशिप मिळाली ७५ रु काॅलरशिप मिळाले. काॅलेज चे प्राचार्यांनी माझा हेवा वाटला,माझे अभिनंदन करुण केले.
तेव्हाची काॅलरशिप आज ७५ हजार रु च्या बरोबरीत आहे .१९४३, ४४ मध्ये आईने स्वयंपाक करायचे शिकविले आई आंधळी पांगळी असल्याने माझे मलाच घरातील काम करावे लागायचे. दरम्यान याच शाळेत माल सरांनी रसग्रहन लिहायला सांगीतले तेव्हा मि एकटाच लिहिणारा होतो. तेव्हा११ वि बोर्डात प्रथम आलो. त्यानंतर काॅलेज पूर्ण झाल्यावर सनद मिळाल्या पासून ३६ वर्षापासून मनमाड मालेगांव. नांदगांव न्यायालयात वकिली करतो, असे आपला जिवनपट ॲड --कासलीवाल यांनी उलगडला.
दरम्याने अध्यक्ष स्थानावरून ज्येष्ठ पञकार संजीव धामणे म्हणाले १९५० मध्ये शाळांत परीक्षा देऊन यशस्वी झालेले ॲड कासलीवाल यांनी ७५ वर्षानी हा विद्यार्थी नव्या पिढीला मार्गदर्शन करतो आहे. प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती असतो असे नाहि, तसेच प्रत्येक शिंपल्यात मोती असतो असे नाही, शिंपल्याचे मोती तयार करणारी व्हि.जे हायस्कूल हि याच शाळेत ॲड- कासलीवाल हे रत्न तयार झाले, असे गौरुध्दगार काढले. याप्रसंगी मुख्याध्यापक एल. एन. ठाकरे, उपमुख्याध्यापक खालकर, श्रीवास्तव, डाॅ. चव्हाण, जेष्ठ पत्रकार संजीव निकम, एम. बी. जगधने, संदीप जेजुरकर, बेडोदे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक, तसेच शिक्षक विद्यार्थी हजर होते.
0 Comments