चांदेश्वरी घाटात पुन्हा अपघात दिल्ली जाणारा कंटेनर पन्नास फूट गेला दरीत चालक जखमी

Bay team aavaj marathi 

डॉ. एस. बी. हिरे पत्रकार कासारी नांदगाव नाशिक 

नांदगाव तालुक्यातील कासारी ते बोलठाण रस्त्यावर कासारी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदेश्वरी घाटात शनिवार दि. १५ रोजी लातुर येथून दिल्ली येथे भंगार घेऊन जाणारा R.J/14- G.G.1809 ट्रक (कंटेनर) पाच वाजेच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे पन्नास फूट दरीत गेला.


ब्रेक फेल झाल्याचे चालकाने लक्षात आल्यानंतर गाडी चालू असतांना उडी मारल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली असल्याचे चालकाने यावेळी सांगितले, परंतु त्याने उडी मारल्याने जखमी झाला असून नाकाला तसेच शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्या आहेत.


दरम्यान कन्नड तालुक्यातील सोलापूर ते इंदोर जाणारा औट्राम घाट मागील काही महिन्यांपासून जड वाहतूकीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर बंद करण्यात आल्यापासून उत्तर भारतात जाणारी सर्व अवजड वाहने कन्नड बोलठाण चांदेश्वरी घाटातून चांदवड ते भुसावळ जाणाऱ्या महामार्गावरुन वळविण्यात आली असून ही अतिरिक्त वाहतूक वळविण्यात आल्या पासून अनेक अपघात झाले असून हा घाट अरुंद आणि प्रमाणापेक्षा जास्त उतार असल्याने पहिल्यांदाच अवघड वाहनं घेऊन आलेल्या चालकांना या घाटाचा अंदाज न आल्याने अपघात ग्रस्त होत आहेत.

गाडीत भंगारच्या नावाखाली दुसराच काही माल असल्याची चर्चा 


दरम्यान सिलबंद कंटेनर मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून दिल्ली येथे जानार्या या गाडीमध्ये भंगारच्या नावाखाली दुसराच काही माल असल्याची चर्चा सुरू असून याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
   

Post a Comment

0 Comments