जनता विद्यालय मुळडोंगरी, येथे विद्यार्थ्यांचे स्वागत

 Bay team aavaj marathi 

नांदगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाजाचे, जनता विद्यालय, मूळडोंगरी या नवीन शाळेची सुरुवात दिनांक १५ अतिशय उत्साही वातावरणात झाली. यानिमित्त विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी शाळेच्या मुख्य इमारतीचे पूजन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने मूळडोंगरी येथे या वर्षापासून इयत्ता ५वी व इयत्ता ८वी चे वर्ग सुरू केले आहे. 

नांदगाव तालुक्याच्या या भागात रोजगाराच्या निमीत्ताने बहुतांश पालकांना बाहेरगावी ये जा करावी लागत असते तसेच अनेक पालकांची शिकवण्याची परिस्थिती नसल्याने शिकण्याच्या वयात आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडतात हे घडु नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला विनामूल्य प्रवेश देऊन त्यांना उत्कृष्ट पोषण आहार तसेच गणवेश व शालेय साहित्य वितरीत करण्यात येणार आहे .

मविप्र समाज संस्थेचे डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीरे राबविण्यात येणार असल्याने याचा फायदा मूळडोंगरी तसेच पंचक्रोशीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना होणार असून या सुविधेबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांनी ग्रामस्थांच्या विनंतीचा मान ठेवून सकारात्मकपणे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडुन शाळेसाठी शासकीय तसेच संस्था स्तरावर पाठपुरावा करून शाळा या ठिकाणी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी विशेष आभार मानले.  

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अशोक मोरे, काशिनाथ मोरे, उत्तम मोरे, बाबू राठोड, गणपत मुकणे, विष्णू चव्हाण, भगवान मोरे, गणेश राठोड, वाल्मीक मोरे, दीपक मोरे, पप्पू मोरे,माणिक बदाने, प्रकाश मोरे ,आदी ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याबाबत तसेच शहरातील मुलांना ज्या ज्या शैक्षणिक सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा देण्यासाठी कटीबद्ध राहु असे आश्वासित केले.

Post a Comment

0 Comments