Bay team aavaj marathi
भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील जिल्हा परिषदेच्या जिवन शिक्षण प्राथमिक विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव अतर्गत नवागतांचे स्वागत शिक्षीका श्रीमती मारवाळे यांनी केले या निमित्त गावातून सवाद्य प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांसह पालकही फेरीमध्ये सहभागी झाले होते.
प्रभात फेरी आटोपल्यानंतर नवागत मुलांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिक्षीकेंनी औक्षण केले, शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी रांगोळी शिक्षीकांनी काढल्या होत्या. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कृष्णाजी शिंदे व सदस्य तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री अनिल बंड व नागरीक यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन शाळेत नव्याने प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणेत आले.
तदनंतर बालकांना वाजत गाजत शाळेत आणले गेले त्याच्यावर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली. पहिलीच्या वर्गात प्रवेश करण्याच्या अगोदर शाळेतील पहिले पाऊल श्रीमती भारती सुर्यंवशी मॅडम व श्रीमती ढाले मॅडम यांनी मुलां मुलींचे पाऊल कुंकवाच्या पाण्यात भिजवून कागदावर पाऊल खुणा घेतल्य . श्रीमती चव्हाण मॅडम व श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी केली. नंतर मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना भोजनामध्ये गोड पदार्थ म्हणून बुंदीचे लाडू देण्यात आले. त्यासाठी श्री पवार सर यांनी मोलाची भूमिका बजावली .श्री अनिल बंड यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. शिक्षक व पालकाची मुलाच्या शिक्षणामध्ये असलेली भूमिका आपल्या भाषणातून मांडली. कार्यक्रमाच्या नियोजनात श्री रामदास चव्हाण सर यांनी सहभाग घेतला. श्रीमती चौधरी मॅडम यांनी आकर्षक असे फलक लेखन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शितोळे सरांनी केले .
0 Comments