घाटमाथ्यावरील शिवसेना नेते भाऊसाहेब सुर्यवंशी यांच्या मातोश्री गं.भा. सुंदरबाई बाबुराव सुर्यवंशी या.ढेकु यांचे वयाच्या ९० वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या रहाते घरी शनिवार दि.१५ रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर दुपारी एक वाजता त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवार आणि आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आईचा अंत्यविधी आटोपल्यानंतर सुर्यवंशी परिवाराने आई सदैव स्मरणात रहावी म्हणून वृक्ष लागवड केली.
गं.भा. सुंदरबाई यांचे पश्चात मुलगा त्र्यंबक व भाऊसाहेब हे दोन मुले तसेच चार मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम दि.२४ रोजी सुर्यवंशी वस्ती येथे होणार असून या निमित्त हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे हरी किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
0 Comments