जातेगाव येथे वनविभागाच्या हद्दीत आढळला एक मयत इसम घातपात असल्याची शक्यता अकस्मात मृत्यूची नोंद

 Bay team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस वनविभागाच्या हद्दीत श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला सोमवार दि.१७ रोजी सकाळी एक अज्ञात व्यक्ती मयत स्थितीत आढळून आल्याने येथील पोलिस पाटील पांडुरंग सोनावणे यांना खबर दिल्यावरुन नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वरील सोमवारी सकाळी काही श्री. पिनाकेश्वर महादेव दर्शनासाठी जानार्या भाविकांना मंदिरापासून साधारण एक किलोमीटर आगोदर एक अज्ञात व्यक्ती निर्जन स्थळी मयत स्थितीत आढळून आले होते. त्यांनी येथील पोलिस पाटील पांडुरंग सोनावणे यांना वरील घटनेची माहिती दिली. त्यावरून त्यांनी शहानिशा करून नांदगाव पोलिस ठाण्यात खबर दिली असता, पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलिस हवालदार भास्कर बस्ते,भरत कांदळकर, साईनाथ आहेर, सचिन मुंढे आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.


त्यावेळी मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईल आणि बाजूला पडलेली असलेली एक हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एम. एच. ०५/ए.ई. ४१७२ आढळून आली. त्यावरून पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तातडीने तपास चक्र फिरवले व नातेवाईकांशी साधला असता, मयत व्यक्तीचे नाव दिपक गोना सोनवणे वय ५४ रा. दत्त मंदिर जवळ १/१ मुरलीधर भोईर कल्याण ठाणे येथील रहिवासी असल्याचे समजले. प्रथमदर्शनी मयत व्यक्तीचा मृत्यू मोटारसायकल वरून पडल्यामुळे झाल्याचा बनाव करण्यात आला असून, त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबरदस्त मार लागला असल्याचे दिसून येत असल्याने अपघात नसून घातपात घडवून आणला असल्याची शक्यता वर्तवली जात असून वरील घटनेचा पंचांसमक्ष पंचनामा करून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. नांदगाव पोलिस ठाण्यात सि.आर.पि.सी. १७४- ३७/२०२४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलिस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments