गेल्या आठवड्यात खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता, त्यांच्या परिवाराचे कुटूंबाचे सांत्वन आ. सुहास कांदे यांनी मंगळवार दि.१८ रोजी केले. याप्रसंगी रोख रकमेसह अन्नधान्य व किराणा सामान देवून काही गरज पडल्यास माझे दरवाजे सदैव उघडे असेल असे गायकवाड परिवारास आ.कांदे यांनी आश्र्वासित केले.
कै. विलास गायकवाड यांच्या कुटूंबात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दीड महिन्याची मुलगी असा परिवार आहे. या सर्वांची जबाबदारी विलास इतर ठिकाणी मजुरी करून पार पाडत होता. गेल्या आठवड्यात विलास मका लागवड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच गतप्राण झाला होता. त्यावेळी कांदे हे मुंबई येथे होते. त्यांना वरील घटना व्यक्त करत नांदगाव येथे येताच त्वरित अपघातग्रस्त गायकवाड कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी गायकवाड परिवारातील सदस्यांशी बोलताना त्यांना गहिवरून आले होते. आ.सुहास कांदे यांनी गायकवाड कुटूंबाला रोख ५० हजार रुपये, २ क्विंटल धान्य, सहा महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिला व हि मदत विनम्र पणे स्विकारण्याची विनंती केली.
आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करणे सुलभ व्हावे यासाठी कै. विलास च्या पत्नीला कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेच, त्याचबरोबर शासकीय ४ लाखांची मदत येत्या आठ दिवसात मिळवून देईन. तो धनादेश मी स्वतः घेऊन येईन. असा शब्द ही यावेळी दिला. याप्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील,प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, शाईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे, आदीसह शेकडो शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ.सुहास अण्णा कांदे यांनी तालुक्यातील आपदग्रस्त अनेक परिवारांना काही दुर्घटना घडल्यास शासकीय मदतीची वाट न बघता त्वरित पदरमोड करून स्वतः खऱ्या अर्थाने कुटूंब प्रमुखांची भूमिका बजावत मदतीला धावून येतात, अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती, तर नागरिकांनी आ.कांदे यांचे धन्यवाद केले.
0 Comments