नांदगांव येथील सौ कमलाबाई माणीकचंद कासलीवाल,व जगंन्नाथ ताराचंद कासलीवाल माध्यामिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक- 21 जून 2024, रोजी साजरा करण्यात आला. येथील, जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना जास्तीत जास्त मुले मुली यांचा योगादिनी सामावेश करण्यात आला.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला अवर्जुन उपस्थित होते. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.पल्लवी राओंदरे यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना योग अभ्यासाचे धडे दिले. व त्यांनी उपस्थीताना योगाचे महत्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले. दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगाची वेगवेगळी आसने केली.
स्कूलचे प्राचार्य मनी चावला, सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार, क्रीडा शिक्षक अशोक बागुल, संजय त्रिभुवन तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा झाला. यावेळी विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्थेचे चेअरमन. सुनीलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल, सुशीलकुमार कासलीवाल, प्रशासक पी.पी गुप्ता इत्यादींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments