लाडकी बहिण योजनेचा आ. कांदे यांचेकडून पाठपुरावा

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

मुख्यमंञी लाडकी बहीण योजनेची आमदार सुहास कांदे यांची सुनिश्चित दखल घेत घर घर जाऊन या योजनेचा प्रेत्येक पाञ लाभार्थी महिलेला लाभ देण्याचा निर्णय घेतला असून या द्रुष्टीने नांदगांव तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुचना केल्या आहे.

 सद्यस्थितीत प्रत्येक महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या लाडकी बहीण योजनेतून शहर व मतदार संघातील एकही गरजू बहीण वंचित राहू नये, याकरिता आमदार सुहास अण्णा कांदे, समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांच्या सूचनेनुसार शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहाच्या शिवनेरी सभागृहात पार पडली.

या बैठकीत मतदार संघातील प्रत्येक घरी जाऊन पात्र लाभार्थी शोधून त्यांना या योजनेचे मोफत अर्ज पुरवून त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहरप्रमुख सुनील जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख रोहिणी मोरे, अँड. विद्या कसबे, निशा चव्हाण, वंदना पांडे, विजया चतुर, नेहा कोळगे, उषा राठोड, रोशनी मुळे, प्रकाश शिंदे, प्रशांत पगार, रवी सोनावणे, बापू जाधव, मंगेश सांगळे, सिद्धेश खरोटे, गौरव वर्देकर, सुनील सोर, शरद आयनोर, राजू सोमासे, आदीसह शेकडो महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments