मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे पाटील, नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. शिंदे, रमेश आण्णा बोरसे, पत्रकार संदीप जेजुरकर, डॉ. काकळीज, काकळीज सर, राजेंद्र पाटील, योगेश बोरसे उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या भक्ती-भावाने व श्रद्धेने विठुरायाचे भजन किर्तन पूजन केले जाते. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच पावन भूमीमध्ये नांदगाव येथील होरायझन ॲकॅडमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विठ्ठल रखुमाई यांच्या पालखीचे पूजन मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर नृत्य सादर केले. तसेच बालगोपालांनी वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या होत्या. यावेळेस बालगोपाल वारकऱ्यांनी मविप्र विद्यालयाच्या मैदानावर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात टाळ, मृदुंग,झेंडे आदी घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला होता. तसेच दिंडीनंतर रिंगणाचेही आयोजन करण्यात आले होते. यात अभंग, गवळणी, पावली आदीसह फुगडीचा आनंद घेतला. यासाठी अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती. पुनम डी. मढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकॅडमीतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. सोनाली खैरनार यांनी केले.
0 Comments