शिक्षकाला शाळा हिच पंढरी आणि विद्यार्थी हाच विठ्ठल असतो. नांदगांव तालुक्यातील मांडवड येथे आषाढी एकादशी निमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड विद्यालयात दिंडी सोहळ्यात संपन्न झाला. सुरुवातीला विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कांबळे मॅडम यांनी सर्व धर्मांना भक्तीचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधान ग्रंथाचे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन केले. विद्यार्थीनींनी विठ्ठल रुक्मिणी यांची हुबेहूब व जिवंत वेशभूषा केली होती.
डोक्यावर तुळस, संविधान ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ, टाळ वाजवणारे विद्यार्थी, मृदुंग वाजवणारे विद्यार्थी, वीणा वाजवणारे विद्यार्थी, हाती चिपळ्या घेतलेले विद्यार्थी, धोतर नेसलेले विद्यार्थी, नऊवारी साडी नेसलेल्या विद्यार्थिनी अशी सर्व दिंडी प्राचार्या कांबळे मॅडम व सर्व शिक्षकांसह गावात निघाली.
गावातून दिंडी जात असताना पालकवर्ग ग्रंथांचे व विठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे पूजन करत होते.दिंडी ग्रामपंचायत आवारात थांबली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तीमय वातावरणात गोल रिंगणात फेर धरला. मुख्याध्यापिका व महिला शिक्षकांनी फुगडीचा फेर धरला. पुढे दिंडीने पुरातन हेमाडपंथी मंडपेश्र्वर महादेवाचे दर्शन घेतले. विद्यालयात पोहचून वर्पे , श्रीमती अहिरे , विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचबरोबर पोषण आहार शिकवणाऱ्या पवार आजी यांनी भजन, अभंग, गवळणी सादर केल्या. संपूर्ण वातावरण विठ्ठल मय झाले. पसायदानाने दिंडीची सांगता झाली.
0 Comments