खा.भगरे यांनी शेतकर्याच्या फोनची दखल घेत कृषी मंत्र्यांसोबत केली चर्चा

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे सर यांचेकडे नांदगांव तालुक्यतील मुळडोंगरी येथील शेतकरी भगवान मोरे यांनी फोनवर कृषी विम्याबाबत व्यथा मांडली, यावेळी तहसिलदार यांना दिलेले निवेदन आणी कृषी विम्याचे पैसे मिळत नाही हि खंत मोरे यांनी व्यक्त केली त्या संदर्भात खा. भगरे सर हे लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मूळ डोंगरी येथील शेतकरी भगवान मोरे यांनी शेती पिकासाठी काढलेल्या विम्याचे पैसे मिळत नसल्याबाबत खा.भास्कर भगरे यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून सविस्तर व्यथा मांडली. यावेळी खासदार भगरे यांनी शेतकर्याचा फोन उचलून त्यांची व्यथा एैकुन घेत संभाषन केले. हि क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. खा.भगरे हे व्यस्त असताना एका शेतकर्याचा फोन उचलला असलेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी खा. भास्कर भगरे यांनी कृषीविम्या संदर्भात केंद्रीय कृषी मंञ्याची भेट घेऊन शेतकर्याना विमा भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे असे म्हटले. तसेच शासनाकडे कृषी विम्याचे प्रस्ताव पडून आहेत केंद्र शासन कृषीविम्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून उमटते तशी ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या पूर्वी माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण हे देखील सर्वसामान्य व्यक्तीचा फोन घेत असे. 


Post a Comment

0 Comments