जनविसश्वास सप्ताह निमित्त माजी खा. समीर भुजबळांनी दि. २१ रोजी नांदगाव मनमाड येथे भेट दिली. यावेळी मा. खा. भुजबळ यांनी नांदगांव मतदार संघातून उमेदवारी करावी अशी मागणी नांदगांव येथील मेळाव्यात करण्यात आली. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शकडोच्या संख्येने उपस्थित होते.आ. कांदे यांनी मागील पंच वार्षीकला माजी आमदार पंकज भजबळ यांचा सुमारे १२ हजार मतानी पराभव केला हा पराभव भुजळांच्या जिव्हारी लागला असून त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खा. भारती पवार यांचा पराभव झाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता आ. कांदे यांचे विरोधात माजी खा. समिर. भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी मागणी असंख्य कार्यकत्यांनी यावेळी लाऊन धरली आहे.
नांदगांव येथील सप्तश्रृंगी हाॅल येथे जनविश्वस सप्ताह निमित्त कार्यकर्ता मेळाव्यात हि मागणी करण्यात आली, ही बैठक राञी उशीरा पर्यंत सुरू होती. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ व जिल्हा प्रमुख ॲड. रवींद्र पगार, विजय पाटील.व अन्य प्रमुखांनी मार्गदर्शन केले यावेळी ॲड.पगार म्हणाले की, भुजबळांच्या उमेदवारी बाबत आपल्या भावना वरिष्ठांना पर्यंत पोहचविल्या जातील असे सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खा. भुजबळ यांचे मनमाड संपर्क कार्यालयात आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, मनमाड बाजार समितीचे सभापती तथा शहराध्यक्ष दिपक गोगड, महिला शहराध्यक्ष अपर्णाताई देशमुख, प्रकाश बोधक, योगेश जाधव, डॉली निकाळे, हबीब शेख, शुभम आहेर, अक्षय देशमुख, जावेद शेख, आनंद बोथरा, दीपाली कोरडे, फिरोज शहा, सुफियांन मिर्झा, समाधान त्रिभुवन, राजू पवार, शफी शेख, सलमान शेख यांच्यासह संचालक मंडळ आदी मनमाड बैठकीत पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनविश्वास सप्ताह साजरा करणे संदर्भात मेळाव्या प्रसंगी नांदगांव नगरीत सारनाथ बुद्ध विहार मध्ये त्यांनी भेट दिली त्याप्रसंगी भगवान गौतम बुद्धांना पुष्पहार अर्पण करताना भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौतम जगताप ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अरुण साळवे विलास कोतकर, अनिल जाधव, विनोद शेलार, राजू लाठे, तानसेन जगताप, आदी उपस्थितीत होते. या वेळी भुजबळ यांचे सारनाथ बौध्दविहार मध्ये स्वागत: करण्यात आले.
यावेळी वरिष्टांचा आदेश आला तर निर्णय घेऊ, तुमची सर्वांची मागणी वरिष्ट्राना कळवितो,असा विश्वास भुजबळ, व पगार यांनी व्यक्त केला. यावेळी विजय पाटील, देवदत्त सोनवने, प्रसाद सोनवने, विनोद शेलार, दिपक गोगड, तालुकाध्यक्ष अर्पणा ताई देशमुख, योगिता पाटील, चंद्रकलाबाई बोरसे, अलकाबाई आयनोर, शहराध्यक्ष सीमा राजोळे, वाल्मीक टिळेकर, भगवान मोरे, योगेश बोरसे, बाळासाहेब महाजन, अरुण पाटील, प्रताप गरुड, पवार, राजेंद्र लाठे, राजोळे, गणेश पाटील, देहाडराय, सुधाकर निकम, अशोक पाटील, सोमनाथ पाटील, दत्तु पवार, नारायन पवार, आदी सह शेकडो कर्याकर्ते उपस्थित होते..
0 Comments