काळे इंग्लिश मीडियम मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

श्री सिद्ध बाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी. काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल तांदुळवाडी.येथे  दि. २२ जुलै रोजि येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश काळे प्राचार्य नेहा काळे व व्हाईस प्रिन्सिपल साक्षी अहिरे यांनी गुरुपौर्णिमाचे महत्व सांगताना सदगुणांचा ध्यास आणि स्वतःला घडवण्याचा प्रत्येक प्रयत्न हीच खरी गुरुपौर्णिमा असे म्हणाल्या

यावेळी प्राजक्ता काकळीज, कविता आयनोर, यांनीही गुरु के बिना ज्ञान नाही ज्ञान के बिना कोई महान नही याबद्दल गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील गुरु शिष्यांच्या बाबत आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वंदना इंगोले यांनी केले तसेच शिक्षक ज्ञानेश्वर सुरसे यांनी आभार मानले, प्रभाकर आहेर,  शिक्षिका रोशनी ठेंगे,मनीषा डोखे,ज्योती बोरसे, अर्चना इंगोले,भाग्यश्री सूर्यवंशी,अमृता जाधव, योगिता सोनार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments