अवैध दारु वाहतूक कारचा पाठलाग करताना पोलीस व्हॅनचा अपघात ठार दोघे गंभीर

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

परराज्यातुन अवैध साठा किंवा अंमली पदार्थ चांदवड घाटातुन नाशिक मार्गे मुंबई जात असतात अशाच प्रकारचा दारूचा अवैधसाठा परराज्यातुन महाराष्ट्रात आल्याची खबर घोटी पोलिसांना मिळाली. त्यावरून दारूबंदी विभागाने पोलीस व्हॅन व एक खाजगी व्हँन सोबत घेऊन अवैध साठा असलेल्या कारचा पाठलाग सुरु केला हा सिनेस्टाईल थरार पाठलाग सुरू असताना झालेल्या अपघातात पोलिस गाडीचा चालकाचा मृत्यू झाला तर दोन कर्मचारी गंभीर जखमी असल्याचे समजते.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, घोटी पासुन दारूचा अवैधसाठा परराज्यातुन महाराष्ट्रात आल्याची खबर घोटी पोलिसांना मिळाली त्यावरून दारूबंदी विभागाने पोलीस व्हॅन व एक खाजगी व्हँन सोबत घेऊन अवैधसाठा असलेल्या क्रेटा कारचा घोटी ते नाशिक ते चांदवड ते मनमाड असा पाठलाग  चालू असताना दारु वाहतूक करणार्या त्या क्रेटा कारने पोलीस व्हँनला कट मारल्याने पोलीस व खाजगी दोन्ही गाड्या अपघातग्रस्त झाल्या पोलीस कारमधील चालकाचा यात मृत्युमुखी पडले.

पोलिस पथकाची स्कारपिओ कार चांदवड नजीक हारणुन नाक्याजवळ अपघात ग्रस्त झाल्याने एक पोलीस कर्मचारी मृत झाला व दोघेजन गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी दवाखाण्यात उपचार सरु आहे. घटनेचा जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने यांच्यासह उत्पादन शुल्कविभाग तपास घेत आहे, दरम्यान दारु वाहतूक करणार्या फरार झालेल्या कारचा नाकेबंदी करुन पाठलाग सुरू आहे.


Post a Comment

0 Comments