निर्मणाधिन कामात भ्रष्टाचार झाला हा आरोप पूर्णतः चुकीचा- अर्जुन पाटील सभापती.

 Bay team aavaj marathi 

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार बोलठाण येथे निर्माणाधिन असलेल्या धान्य शेडचा लोखंडी कैच्यांचा सांगाडा पडला आहे. शेड पडलेले नाही, त्यावर कोणतेही पत्रे अथवा छत नव्हते. लोखंडी सांगाडा चढवितांना कारागीरा कडून काही तांत्रिक चुक झाल्याने सदर लोखंडी सांगाडा खाली कोसळला याचा अर्थ शेड पडले असा होत नाही.

अर्जुन (बंडु) पाटील सभापती कृ.बा.समिती नांदगाव 

हा सांगाडा अतिशय मजबूत आहे, कोणतेही निकृष्ट दर्जाचे मटेरियल या ठिकाणी वापरण्यात आलेले नाही, परंतु काही राजकीय सूडबुद्धीने बाजार समितीची विनाकारण बदनामी करत आहेत. निकृष्ट काम सुरू असल्याचे म्हणून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राजकीय फुस असून हे एक राजकीय बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. प्रत्यक्षात सदर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने होत असून  झालेला प्रकार हा अपघात आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

शेडचे काम सुरू असतांना पडलेला सांगाडा 


तसेच सन 2021/22 मध्ये केलेल्या कामा बाबत तत्कालीन ठेकेदाराने कार्यालय इमारत व तार कंपाउंड चे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराचे अंतिम देयक बाजार समितीने दिलेले नाही. त्यामुळे कामात भ्रष्टाचार झाला हा आरोप पूर्णतः चुकीचा आहे. असे स्पष्टीकरण नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन (बंडू)पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments