विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले जिवदान

 Bay team aavaj marathi 

नियतक्षेत्र ढेकू येथील शेतकरी सोपान गोविंद सूर्यवंशी याचे मालकी गट न १६/२ मधील विहिरी ७० फुट विहिरीमध्ये कोल्हा वन्यप्राणी पडल्याची बातमी मिळाली वन विभागास शेतकरी सूर्यवंशी यांनी मंगळवार दि.९ रोजी दिली.

त्या अनुषंगाने वनरक्षक नवनाथ बिन्नर यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून त्याबाबत वनविभागाचे अधिकारी सागर ढोले यांना कळविले, व त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार वनरक्षक बिन्नर अमोल पवार यांनी वन विभागाचे कर्मचारी विष्णु राठोड, वनमजूर विष्णू जाधव, वाल्मीक चव्हाण, दशरथ जाधव यांच्या मदतीने ७० फूट विहिरीतून कोल्हा सुखरूप बाहेर काढून त्यास नैसर्गीक अधिवासात सोडले. यावेळी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments