सुमारे ५० मेंढ्या चेंगरुन पसार झालेल्या ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

 नांदगांव मनमाड रस्त्यावर दि. ९ रोजी सायंकाळी हिसवळ खुर्द. शिवारात स्थलांतरित होणार्या सुमारे ५० मेंढ्याना चेंगुरुन पसार झालेल्या मालवाहु ट्रकला मनमाड येथे पकडण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील हंगामात दुष्काळात चारा पाण्याच्या शोधात स्थलांतरित झालेल्या मेंढ्या सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुन्हा आपल्या गावाकडे मेंढाचा कळप नांदगांव कडुन मनमाड दिशेने मेंढ्याचा कळप मेंढपाळ घेऊन जात असताना नांदगांव कडुन मनमाड कडे जाणार्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने वाहन चालून सुमारे ४५ते ५० मेंढ्या चेंगरुन घटनास्थळा जवळून न थांबता मालट्रक घेऊन पसार झाला.

मेंढ्या चेंगरल्याचे रक्तरंजित फोटो असल्यामुळे बातमी जोडलेले नाही

 यावेळी काही तरूणांनी दुचाकीवरुन त्याचा पाठलाग केला व मनमाड पोलीसाना घटनेची माहिती फोनवरुन दिली त्यावरून मनमाड पोलिसांनी तत्काळ मालट्रक मनमाड मालेगांव नाक्यावर ताब्यात घेतला या प्रसंगी दत्तु पवार नामक व्यक्तीने मेंढपाळांना मदत केली. या अपघातात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले. या प्रसंगी रोडवर ठार झालेल्या मेंढ्याचा रक्ताचा सडा पडला होता,या घटनेमुळे परिसरात संताप उमटला व हळ हळ व्यक्त झाली.

Post a Comment

0 Comments