मागील वर्षी भाव कमी असल्याने शासनाने कांदा उत्पादक शेतकरी याना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते ,त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला , परंतु नाशिक जिल्ह्यातील 1668 शेतकरी अजुनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
वरील प्रश्नाबाबत शेतकरी बांधवांनी अनुदाना बाबत अनेक वेळा विचारणा केली, त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव यांची भेट घेतली असता,चर्चेतून असे लक्षात आले की अनुदान वाटपाबाबत शासनाकडे अहवाल आलेलाच नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकरी याना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते. बाजार समिती कडे विचारणा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने अनेक अखेर आज दिनांक 8 जुलै रोजी बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी थेट मंत्रालय गाठून पणन विभागाचे मुख्य सचिव श्री अनुप कुमार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली. व त्याबाबत लेखी निवेदन दिले. वंचीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे असा आग्रह लावून धरला.
यावर सचिव अनुप कुमार यांनी पणन महासंचालक यांचा शी सम्पर्क करून माहिती घेतली ,तसेच येवला बाजार समितीचे सचिव यांच्याशी ही दूरध्वनीवरून माहिती घेतली व उपसचिव देशमुख साहेब यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वरील प्रश्नाबाबत शेतकरी बांधवांनी अनुदाना बाबत अनेक वेळा विचारणा केली, त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव यांची भेट घेतली असता,चर्चेतून असे लक्षात आले की अनुदान वाटपाबाबत शासनाकडे अहवाल आलेलाच नाही. मग त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वंचीत शेतकरी बांधवाना न्याय देण्याची विनंती केली.
याबाबत येथेच न थांबता अनुदान मिळेपर्यंत योग्य त्या व्यासपीठावर पाठपुरावा नक्की केला जाईल व माझे कर्तव्य पार पडण्याचा आटोकाट पर्यन्त करत राहील असे येवलाकृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन आहेर यांनी बोलतांना माहिती दिली.
0 Comments