नांदगांव नजिक दोन वाहनांचे अपघात जीवित हानी नाही मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात?

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव मनमाड नॅशनल हायवेवर दोन मालवाहु ट्रक कंटेनर चा झोप लागल्याने व मद्ये आवस्थेत वाहन चालवल्याने अपघात झाला. ४० गांव चांदवड नॅशनल हायवे ७५३ जे वर मध्यराञी दोन वाहनांचा अपघात झाला या घटनेत जीवित हानी झाली नाही पण दोघी वाहनांचे मोठे नुकसान झाले एक झुपकी एक अपघात आणी दुसरा अपघात वाहन चालकाने मद्येप्राशान केल्याने हा अपघात झाला? दोन्ही अपघात एकाच ठिकाणी एक तासाच्या अंतरावर घडले .दोन्ही वाहनांचे चालक माञ बालबाल बचावले.

दि २३ जुलैच्या मध्यराञी दुचाकीचे स्पेअरपार्ट घेऊन जानार कंटेनर नंNL/01/ Q 2641 हा कंटेनर छञपती संभाजी नगर हुन नांदगांव मार्गे मनमाड दिशेने जात असताना नांदगांव नजीक ४ किमी अंतरावर मातोश्री मंगलकार्यालया जवळ मध्यराञीच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर रोडच्या बाजूला पलटी होऊन ३३ ००० HP पावरच्या वीज वाहक खांबार जाऊन आदळला यावेळी विजपुरवठा बंद पडल्याने पुढील अनार्थ टळला, दुसर्यादिवसी क्रेनच्या मदतीने कंटेनर उभा करण्यात आला या अपघातात महाविरणचे हजारो रूपयांचे नुकसान झाले त्याची भरपाई वाहन मालकाकडून करण्यात आली राञी उशिरा पर्यंत विजेचे खांब उभे करुन विजपुरवठा सुरळीत करण्यात आला ,या अपघातात एका वीज खांबाला धडक बसल्याने पाच विजेचे खांब बाधित झाले होते. दुसारा अपघात या चा मार्गावर याच ठिकाणी एका तासाच्या फरकाने घडला या अपघातात वाहन क्रमांक MH 19/CV 9262 हा एैशियर टेंम्पो नांदगांव हुन मनमाड दिशेने जात असताना चालकाने मद्यपान केले ?असल्याने सदरचा टेम्पो दुभाजकावरुन उडुन दुसर्या मार्गावर गेला या प्रसंगी दुभाजकावरील पथदिप चा खांब तोडून मातोश्री मगलकार्यालयाच्या भिंतीलगत थांबला यात गाडीचे मोठे नुकसान झाले.
 
दरम्यान नांदगांव ते मनमाड नॅशनल हायवे वर नांदगांव शहरातुन निघालेला दुभाजक चार पदरी मार्गा वर मातोश्री मंगल कार्यालया जवळ हा रस्ता चार पदरीचा दोन पदरी झाल्याने या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद झाल्याने वाहन धारकांची मार्गपास करताना तारांबळ उडते समोरून येणारे वाहन आपल्या अंगावर येते की काय अशी भिती वाहन धरकांना वाटते आणी या दुभाजक रस्ता संपताच अरूद रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत या ठिकाणी असलेल्या अरूद रस्ता रुंद करुन वाहनांचा मार्ग मोकळा करुन होणारे अपघात टाळावेत अन्यथा येथे अपघात होतच राहतील तसेच याच मार्गावर हाॅटेल माऊली जवळ रस्त्यावरील साईड पट्ट्या आजुन रूंद केलेल्या नाही. तसेच या वेळी टोलरोडवरील संबंधीत ठेकेदारने भरपाई करुन घेत टेंम्पो सोडून दिला या पूर्वी याच ठिकाणी लाहनमोठे अपघात झाले तेव्हा पथदिपचे विजेचे खांब तोडले त्यांची भारपाई मिळाली? पण ते पथदिप पुन्हा उभेकेले नाहीत आत्ता पर्यंत पाच पथदिप खांब तुटले भरपाई मिळून देखिल ते नविन बसवले नाही अशी ओरड फुलेनगर वासीयांनी केली .

 या मुळे अपघात होत आहेत पाच वर्षे झाले रस्ता बनवुन आणी एक. वर्षापासून टोल जकात वसुलीचा धडाका चालु आहे पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे व पथदिपांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष देत नाही बर्याच वेळा मध्यराञी अंधार्याराञी पथदिप बंद केले जातात. त्यामुळे पादचार्यांचे व पहाटे व राञी फिरायला जानार्या महिला व वृध्दांची कुचंबना होते या कडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments