Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या वतीने दि २५ रोजी नांदगाव पंचायत समितीच्या समोर आशा गट प्रवर्तकांच्या मागण्या संदर्भात निदर्शने व आंदोलन करुन मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले पंचायत समिती कार्यालायाच्या मुख्ये गेटवर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मागणी संदर्भात घोषना देवून, मागण्या वाढिव मानधनासह थकीत मानधन मिळावे, आशा सेविकांना मिळणार्या मानधनाचि वेतन चिठ्ठी मिळावी.आशा सेविका व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करावे.शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, १० हजाराचा मानधन आदेशाचा अध्यादेश काढण्यात यावा, गटप्रवर्तकाना राज्यकर्मचारी दर्जा मिळावा. त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन लागू करावे. या प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी दिलेल्या निवेदनावर कल्पना शिंदे, विजय दराडे, छाया जाधव, लता लाठे, संगिता काकडे, ज्योती निकम, सुप्रिया पाटील,सुरेखा गंडे ,रत्ना केदारे, संगिता बोरसे, उज्वला खताळ, दिपाली सानप, रिना ठाकुर, मोहिनी मेंद, छाया सोनवने, शितल शेळके यांच्यासह इतर गटप्रवर्तक आणि अशा सेविकांच्या निवेदनावर सह्या आणी नावे आहेत.
0 Comments