नांदगांव येथे शेतकर्याच्या प्रश्नावर माजी आ. अनिल आहेर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार अँड. अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसील कार्यालया समोर  शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मिञ पक्षानी देखील सहभाग नोंदविला. 

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोणीही उपाशी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात कबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकर्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जगेल. असा हा शेतकरी राजा सद्यस्थितीत निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटाला सामोरे जात शेती करत असतो.

 परंतु या केंद्र व राज्य सरकारच्या नियतित खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही. पिक विम्याच्या नावाखाली देखील शेतकरी वर्गाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्यभरातील ४० तालुक्यात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला परंतु प्रत्यक्षात राज्यातील दुष्काळाची वास्तव परिस्थिती व अतिशय गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्याना दुष्काळग्रस्त जाहीर यादीतून वगळण्यात आले, व त्यानंतर तात्पुरती मलम पट्टी म्हणून दुष्काळसदृश्य म्हणून घोषित करण्यात आले, परंतु NDRF निकषाप्रमाणे दुष्काळसदृश्य तालुक्यांना मदत मिळाली नाही. हे सरकार फक्त घोषणा करून शेतकरी वर्गाची फसवणूक करीत आहे. हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारचा आम्ही भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध म्हणून आम्ही हे एकदिवसिय धरणे आंदोलन करीत आहोत. शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपाचे करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. यावेळी नांदगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दर्शन अनिलकुमार आहेर, उदय अप्पा पवार, डॉ.शरद आहेर, उदय पाटील, माजी. सभापती राजेंद्र आहेर, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.पुंजाराम आहेर, विलास सरोवर, आरिफ मन्सुरी, अरुण निकम, सोमनाथ पवार, अनिल सरोदे, राजेंद्र चाकणकर, निरंजन आहेर, हितेंद्र पगार, रामचंद्र आहेर, डॉ. सागर भिलोरे, भगवान डांगे, भागवत भवर, कैलास गायकवाड, धनंजय काळे, मोहन पवार, किशोर गडाख, सुनिल पवार, महेश पाटील,यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, शिवसेना (उबाठा गट) संगटक शिवाजी वाघ, अद्वय आबा हिरे मित्र मंडळा तर्फे गणेश ऊर्फ विकी खैरनार, अखिल भारतीय बंजारा सेलचे चव्हाण सखाराम मांगु आदींनी उपस्थीत राहून पाठिंबा दर्शविला.

Post a Comment

0 Comments