नांदगाव तालुक्यात गावागावत वाड्या वस्तीवर आणी जंगलात शेकडोच्या संख्येने हरीण अढळू लागल्या आहेत त्याचप्रमाणे तालुक्यात ग्रामीण भागात आनेक गावातील शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे.
दि. २४ जुलै रोजी नांदगांव नजिक फुलेनगर येथे नागरीकाना बिबट्याची जोडी दिसल्याने घबराट पसरली आहे. त्यामुळे नांदगांव शहराच्या बाजूला बिबट्या येऊन ठेपला असल्याने फुलेनगर, श्रीरांमनगर, गिरणानगर परीसारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात हरणांचे शेकडोच्या संख्यने वावर असल्याने आता या भागात बिबट्याच्या जोडीने इंटरी केल्याने नागरिकांचे इंडिकेटर लागले असून सध्या खरीप पिकांची चांगल्या प्रमाणात वाढ झाल्या वन्यप्राण्याना लपण झाले आहे. फुलेनगर, श्रीरामनगर, क्रांती नगर, साकोरा, हिंगणवाडी, हिसवळ आदी भागात हरणांचा मुक्त संचार असल्याने नाग्या-साक्या वन विभागाच्या हद्दीत बिबट्याची जोडी सोडली असावी असा अंदाज नाकरीक बांधतात.
या बाबत् सविस्त आसे की, फलेनगर येथे दि २४ जुलै रोजी राञी ९ वा नांदगांव मनमाड रोडवर मातोश्री मंगल कार्यालया जवळ बिबट्याच्या जोडीचे (दोन बिबटे) दर्शन झाले यावेळी BSNL चे दोन कर्मचारी दुचाकीवरुन प्रवास करीत असताना त्याच्या नजरेत आले या भागात पथदिप असल्याने रस्ता ओलांडतांना बिबट्याचे स्पस्ट दर्शन झाले तेव्हा या दोघांनी सावध पविञा घेत बिबट्यांनी रस्ता ओलांडताच ते तेथून निघाले. दरम्यान सुरेश पाटील यांना देखील बिबट्या नजरेत आले तेव्हा या दोघां बिबट्यानी कोंबड्याची शिकार केल्याचे सांगिले या मुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
सध्या बिबट्याचा वावर फुले नगर, श्रीराम नगर हिंगणवाडी या परिसरात असून या भागात मोठे जंगल आहे लागून नाग्या- साक्या धरण व मोठे जंगल देखील आहे याच भागात हिसवळ, हिंगणवाडी, फुलेनगर जंगल गावांना व शिवांना लागून डोंगर दर्या व जंगल असल्याने बिबट्याला लपण्यास मोठा परीसर आहे. गत एक महिण्यात पासून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात वनविभागाने अधिक वावर आसलेल्या ठिकाणी चोकशी करून उपाय योजना कराव्यात अशी मागणी आहे. दरम्यान चिंचविहीर लोढरे येथे बिबट्याचा वावर असून चिचविहीरचे शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान फुलेनगर येथे बिबट्याची जोडी असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष भेटीत सांगण्यात आले .
0 Comments