भालुर येथे दोन दिवस 'राष्ट्रीय सरपंच संसदेची' बैठक उत्साहात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता.

 Bay - team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव नाशिक 

नांदगाव तालुक्यातील भालुर येथे राष्ट्रीय सरपंच संसद' बैठकीचे दि.२४ व २५ रोजी आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष- -स्थानी प्रमुख समन्वयक श्री.योगेशजी पाटील हे होते. तर उदघाटक तहसीलदार श्री.सुनिलजी सौंदाणे हे होते. तर गटविकास अधिकारी श्री.संदीपजी दळवी प्रमुख अतिथी होते. सह समन्वयक श्री.प्रकाश महाले, तालुका वनाधिकारी श्री.शंकरजी पाळेवाड व यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत स्थापित राष्ट्रीय सरपंच संसद आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात वृक्षारोपण महायज्ञाचे आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत सरपंच संसदेचे सदस्य असणाऱ्या राज्यातील ३५१ तालुक्यातील ३४०० ग्रामपंचायच्या कार्यक्षेत्रात 'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत ३४ लक्ष वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने सरपंचांच्या नेतृत्वा- खाली लोक सहभागातूनहा उपक्रम यशस्वीपणे साकारत आहे 'वृक्षारोपण महायज्ञाची' सुरुवात भालूर येथे वृक्षारोपण  करण्यात आले. राष्ट्रीय सरपंच संसदचे नांदगाव तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, समन्वयक श्री. समाधान पाटील, संघटक श्री.राजेंद्र तळेकर, महिला समन्वयक सौ.वैशालीताई पगार व महिला संघटक सौ. वर्षाताई भाबड हे या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक होते. या कार्यक्रमाची सुरुवात छ.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 

उपस्थितांचे स्वागत श्री.राजेंद्र तळेकर केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.राजेंद्र पवार यांनी केले. तर तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वनाधिकारी आणि प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम सांगतेच्या वेळी पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी भालूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या भव्य प्रांगणात वृक्षारोपण करून राष्ट्रगीताने करण्यात आली. येथील सरपंच सौ. भालूबाई भाऊसाहेब थेटे, उपसरपंच श्री.रमेश निकम, तसेच ग्रा.प.सदस्य, ग्रा. प. कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले, यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते, उपस्थितांचे येथील ग्रामविकास अधिकारी युवराज निकम यांनी आभार मानले.






Post a Comment

0 Comments