नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुसुमतेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता रविवार दि.२८ मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण तसेच वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता केली.
सविस्तर वृत्त असे की शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने कुसुमतेल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या उपक्रमाचे नियोजन करून प्रत्यक्ष राबविण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसह प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रभात फेरीत घोषवाक्य, पोस्टर यांचा प्रभावीपणे वापर करण्यात आला, शालेय आवारात एकत्रित आल्या नंतर विद्यांजली नोंदणी, स्वयंसेवकाची नावे घोषित करून या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या सप्ताहात दररोज केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची ग्रामस्थ माता-पित्यांना विद्यार्थी कृतीतून झलक प्रदर्शित करण्यात आली.
त्याचबरोबर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला शालेय व्यवस्थापन समिती कुसुमतेल अध्यक्ष श्री संजय जगताप व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री संजय गावंडे यांनी दानशूर व्यक्ती म्हणून शालेय विद्यार्थी व समुदायास मिष्टान्न भोजनात मसालेभात,म्हैसूर पाक व फरसाण हे पदार्थ दिले जेवणाचा सर्व खर्च करून त्यांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी सरपंच श्री संदीप पाटील व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, येथील पोलीस पाटील, श्री.अशोक पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे मागील अध्यक्ष श्री.कैलास कोळपे व सर्व सदस्य,मोठ्या पालक व नागरिक उपस्थित होते.
अशा प्रकारचे शालेय कार्यक्रम तसेच स्नेह भोजनाचा कार्यक्रम शाळेत अधुन मधुन व्हावेत यासाठी दानशूर नागरिकांनी स्व वधतः सर्व खर्च करणे बाबत पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील अहिरे सहशिक्षक श्री मनोज गायकवाड व श्री संदेश कुमार मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
0 Comments