मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी नांदगाव येथे शिक्षक पालक संघाची मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच निवड करण्यात आली. या वेळी डॉ. प्रविण निकम देविदास पगार ज्येष्ठ नागरिक रमेश बोरसे, आदी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील प्रत्येक पालक प्रतिनिधींची लोकशाही पद्धतीने पालक संघ समिती तयार करण्यात आली. यावेळी दादाभाऊ राठोड, सोनम फटांगरे, अंकित फोफलिया,हेमाली कुलथे, मच्छिंद्र काळे, सोनाली पाटील, आशिष लोढा,पूजा पवार आदींची वर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रतिनिधीतुन संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्या श्रीमती पूनम डी मढे यांची सर्वानुमते नियुक्ती झाली. तर इतर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
वर्ग प्रतिनिधी मधून उपाध्यक्षपदी दादाभाऊ राठोड यांची निवड झाली. तसेच सचिव म्हणून श्रीमती. सोनम फटांगरे यांची निवड झाली. सह.सचिव पदी श्रीमती.सोनाली पाटील यांची निवड करण्यात आली सर्व निवड झालेल्या पदाधिकारी यांचे मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक बोरसे-पाटील यांनी अभिनंदन केले. या प्रक्रियेसाठी प्राचार्या श्रीमती. पुनम डी. मढे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यासाठी योगदान दिले, सूत्रसंचालन श्रीमती.अनुराधा खांडेकर यांनी केले.
0 Comments