नांदगांव येथे १३६ वर्षाची परंपरा जपत संत शिरोमनी अखंड हरीनाम उत्सवाला प्रारंभ

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

१३६ वर्षा पासून नांदगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे या निमित्त सलग सात दिवस अखंड हरिनामाचा सप्ताह गाथा पारायन व श्री शिव महापुराण कथामृत व भव्य कीर्तन सोहळा आयोजीत करण्यात आला असून, आज रविवार दि. २८ जुलै रोजी संत सावता महाराज उत्सवाला सुरुवात झाली आहे. दि. ४ ऑगस्ट २४ रोजी सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने समारोप होणार आहे या उत्सवाच्या कलश पूजनाने सुरुवात करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे ज्येष्ठ नागरीक तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णु निकम यांनी अध्यक्षस्थान भुषविले सप्ताहात आमदार सुहास कांदे, अनिल करवा, प्रकाश पाटील, सुनंदा पाटील, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार संजय पवार, डाॅ. रोहन बोरसे, तहसीलदार अनिकेत निकम, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी नगराध्यक्ष श्रिनिवास कलंञी,रमेश बोरसे,माजी सभापती सुभाष कुटे, राहुल परदेशी, संजय महाजन, शांतीलाल श्रीश्रीमाळ, ॲड सचिन साळवे, अन्ना बागोरे, संजय पवार, हरी गायकवाड, संदीप जेजुरकर, मारुती जगधने, खंडेराव खैरनार, पोपट सुरसे, वसंत खैरनार, सुरेश पवार, बाळासाहेब महाजन, शंकरराव पवार, सुपडु वाघ, रंजना सकट, गिरीराज निकम, सतीश जाधव, सोपान मोकळ, रवींद्र देशमुख, पदमाकर दुसाने आदी यजमान यावेळी पुजनास उपस्थित होते. या सप्ताह प्रसंगी महिला प्रभात फेरी, सजावट, स्वच्छता, पालखी, पाहुण्यांचे स्वागत, देखरेख समिती आदींची नियुक्ती केली आहे.

संत सावता माळी हे महाराष्ट्रातील एक थोर संत होऊन गेले. त्यांचा जन्म इ.स. १२५० सुमारास माळी समाजात झाला. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि त्यांनी आपल्या कीर्तन व भक्तिगीतांद्वारे वारकरी परंपरेला महत्त्वपूर्ण योगदान दिले. श्रम हीच पूजा आहे त्यांनी त्यांच्या शेतकामातूनच ईश्वर साधनेचा मार्ग सर्व सामान्यांना दाखवला. त्यांच्या कीर्तनांतून आणि अभंगांतून त्यांनी शेतकऱ्यांना आणि समाजातील इतरांना परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले. संत सावता माळी यांचे निधन इ.स. १२९५ च्या सुमारास झाले. त्यांच्या कार्यामुळे ते आजही महाराष्ट्रातील संत परंपरेत एक विशेष स्थान धरून आहेत. त्यांच्या उपदेशांमुळे अनेक लोक आजही प्रेरित होऊन आपला जिवनक्रम यशस्वीपणे चालवत आहेत. नांदगांव येथे १३६ वर्षाची परंपरा जपत या वर्षात ही या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीने केले आहे.

 यात देवाची आळंदी येथील ह भ प प्रसाद गडदे,  रविंद्रसिंग राजपुत, एकनाथ चत्तरशास्ञी, युवराज देशमुख, हभप कन्हैय्या राजपुत, ज्ञानेश्वर कदम, उल्हास सुर्यवंशी, उमेश दशरथे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सात दिवस व काल्याचे कीर्तन दि ४ रोजी सकाळी ९ ते ११ वा व महाप्रसाद सांगता, दरम्यान शहरातुन दिंडी सोहळा होईल. या दरम्यान सात दिवस कथा वाचक सुश्री रामप्रिया माई अमरावती यांचे नियमित कथा वाचन होणार असून धार्मीक कार्याचा भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून, दररोज पहाटे ४ ते ६ वा काकडा भजन, ८ ते १२ गाथा पारायन, सायंकाळी६ ते ७ हरीपाठ, दुपारी २:३० ते ६ वा.पर्यंत शिवमहापुराण कथामृत,व रोज राञो ९ ते ११ कर्तन असे धार्मिक कार्यक्रम या सप्ताहात होतील असे आयोजक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाणी महिला व पुरुषांना स्वतंञ आसनं व्यवस्ता केली असून कार्यक्रमास नाशिक, छ. संभाजीनगर, जळगांव, अहमदनगर, धुळे, येथून सालाबाद प्रमाणे भाविक उपस्थित असणार आहे.


 

Post a Comment

0 Comments