जि.प. प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा संपन्न

 Bay-team aavaj marathi 

मंगळवार दि.16  रोजी जिल्हा परिषद शाळा कुसुमतेल येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले.अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत व पंढरपूरचे स्वामी विठू माऊली व रखुमाई यांचे प्रतीकात्मक वेशभूषा शालेय विद्यार्थ्यांमधून साकारण्यात येऊन टाळ, मृदुंग, विना, पालखी, पताका यासोबतच लेझीम घेऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक भक्ती गीत आणि  अभंगात तल्लीन होऊन गावातील मुख्य रस्त्यावरून श्री विठ्ठलाच्या जयघोषात दिंडी मार्गस्थ झाली. याप्रसंगी गावात विविध ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले व या सोहळ्यात सहभागी झाल्या.

यावेळी ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी देखील काढण्यात आली होती, या दिंडी सोहळ्यात गावातील पालक, स्त्री पुरुष , बालगोपाल व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महाराष्ट्राचा धार्मिक वारसा जपण्यासाठी कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पाडण्यात गावचे सरपंच श्री संदीप भाऊ पाटील, पोलीस पाटील श्री अशोक भाऊ पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय भाऊ जगताप, उपाध्यक्ष संदीप भाऊ गावंडे, ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच विकास भाऊ जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा साकारण्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल अहिरे सर, सहशिक्षक श्री मनोज गायकवाड सर, श्री संदेशकुमार मेश्राम सर व सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments