न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एकादशी निमित्त विविध कार्यक्रम

 Bay- Team aavaj marathi 

मविप्र समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव विद्यालयात आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळा व विविध परिक्षांमध्ये तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारे विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक इंजि. अमित उमेदसिंग बोरसे-पाटील होते.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून गोल रिंगण केले व अभंग तसेच गवळणी गात वारीचा अनुभव घेतला. पालखीची मिरवणूक काढण्यात आली वृक्षारोपण करण्यात आले वर्षभरात शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी अद्विका पवार, हेमांगी दौंड तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र वेदिका जाधव नवोदय परीक्षेत पात्र धनश्री जाधव एन एम एस परीक्षेत पात्र सार्थक बुरकुल, नचिकेत समुद ऑलिंपियाड परीक्षेत पात्र आरुषी बोरसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक बोरसे-पाटील तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय काकळीज यांच्या हस्ते पार पडला.

 यावेळी सभासद बाळासाहेब कदम रमेश बोरसे, नितीन जाधव, सचिन पवार, राजेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी संचालक बोरसे- पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संतांचा आदर्श घ्यावा, प्रतिकूल परिस्थितीतून ज्ञान मिळवावे यशस्वी व्हावे. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, अनिकेत भिलोरे याची सार्वजनिक बांधकाम विभागात निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. काकळीज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बी.पी.बिन्नर यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी एम भिलोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी  उपमुख्याध्यापक श्री वैद्य, पर्यवेक्षक श्री खुटे व सर्व सेवक वृंद यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments