कासलीवाल विद्यालयात 'विठ्ठल नामाची शाळा भरली '

Bay-team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

मंगळवार दि. 16 जुलै नांदगाव येथील सौ.क.मा. कासलीवाल विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत येऊन विठ्ठल नामाचा गजर करत अवघा शालेय परिसर भक्तिरसात चिंब भिजून गेला. ही संतांची भूमी आहे.संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, संत तुकाराम, यांचे अभंग म्हणत विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार विशाल सावंत,गोरख डफाळ यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विठ्ठल नामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची ही दिंडी सावता मंदिरात पोहचली.या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये,अभंग गायन, समूह नृत्य,गोल रिंगण,फुगडी, वारकरी पाऊली इ. गायले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.यानंतर बाल वारकऱ्यांची ही दिंडी शहरातील मुख्य चौकातून शाळेत आली.

सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता ,विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार विशाल सावंत,गोरख डफाळ,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments