नांदगाव येथील जे. टि कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सोमवारी दि.१५ रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती.
विठूमाऊलीच्या अभंगावर ठेकाधरत बालवारक-यांनी दिंडी उत्सवात साजरी केली. स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये समूह नृत्य,गोल रिंगण, वारकरी पाऊली इ. विद्यार्थ्यांनी माऊली माऊली चा गजर करत,विठ्ठल नामाची शाळा भरवली,पंढरी पंढरी अभंग गात ,पाऊली खेळत आपला उत्साह द्विगुणीत केला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संत गोराकुंभार हे विठ्ठल भक्तीत कसे दंग होतात हे समूह नृत्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर रित्या दाखविले.
यानिमित्ताने पाणी वाचवा हा संदेश एक नाटिकेच्या माध्यमातून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमाच्यावेळी स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख सौ.सुवर्णा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षकांनी मिळून केले होते. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता ,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
0 Comments