बौद्ध समाज सामाजिक सभागृहा जवळ डबके साचल्याने दुर्गंधी

 Bay- team aavaj marathi 

K.k.महाले पत्रकार जातेगांव, नांदगाव नाशिक 

जातेगाव येथील ग्रामपालिकेचे दुर्लक्ष बौद्ध समाज सामाजिक सभागृहा जवळ सांडपाणी तसेच पावसाळ्यात पावसाचे पाण्याचे व्यवस्थापन नसल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने या भागात असलेल्या आदिवासी वस्ती असून त्या नागरिकांना टायफाईड मलेरिया, डेंग्यू इत्यादी साथीच्या आजारांची लागन होण्याची शक्यता आहे.

या परिसरातील स्वच्छतेकडे ग्रामपालीका प्रशासनाने तत्काळ काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, याच भागात गावातील पाणी पुरवठा करण्याची टाकी असून एखादी मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्यास गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथे आदिवासी वस्ती असून त्या नागरिकांच्या घरासमोर मोठमोठे पाण्याचे डबके साचलेले आहे त्यामुळे नागरिकांना त्या अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाण्याच्या डब्यातून जावे यावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे 
तरी ग्रामपालिकेने याकडे वेळीच लक्ष घालून या पाण्याची विल्हेवाट लावून तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments