रोहिले बु||. येथील तरुण बेपत्ता पोलिसात तक्रार दाखल

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

 नांदगांव तालुक्यातील रोहिले बु!! येथील ग्रांमपंचायत सदस्यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल वय २५ हा पाच दिवसा पासून बेपत्ता झाला आहे या घटनेमुळे परिसरात नागरिकात तर्कवितर्क होत आहे. याबाबत बेपत्ता झालेल्या तरुणा बाबात् नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नांदगाव पोलीस तपास घेत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बु!! येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल हा बुधवार दिनांक 10 जुलै 2024 पासून घरातून नांदगाव येथे कामासाठी जातो म्हणून सांगून गेला तर तो रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही. त्याचा नातेवाईक, मित्र, आणि इतरत्र तपास केला असता तो मिळून आला नाही. त्याचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याची पत्नी माहेरातच आहे. सतीश बागुल हा त्याच्या आईवडिलांकडे राहत होता. परंतु काही कामानिमित्ताने तो नांदगाव येथे गेला. रात्री उशिरापर्यंत आलाच नाही त्यामुळे त्याचे वडील सुरेश भास्कर बागुल यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 14 जुलै 2024 रोजी तक्रार दिली असून या वरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (गुन्हा) दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments