आईने धुणी भांड्याचे काम करून बनविले मुलाला अधिकारी, सुदर्शन ची केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात भरारी

 Bay- team aavaj marathi 

शिक्षण सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, आईने मोठ्या जिद्दीने कंबर कसून अनेक ठिकाणी धुणी-भांडी करून मुलाच्या शिक्षणाला पैसे पुरविला. मुलानेही आईच्या कष्टाचे चीज करत अणुऊर्जा विभागामध्ये औषधनिर्माण अधिकारी बनून आईचे स्वप्न पूर्ण केले. ही कहानी आहे आष्टी (ता. परतूर) येथील सुदर्शन सवणे याची. दरम्यान, सुदर्शन सवणे शुक्रवारी १३ मार्च रोजी गावाकडे येताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
आष्टी येथील शिवसंत लक्ष्मण महाराज मठातील विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज सुदर्शन आणि त्याच्या आईचा सत्कार
 करताना.

सुदर्शन अशोक सवणे याचे प्राथमिक शिक्षण केंधळी या गावांतील तर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. दरम्यान, पुढील उच्च शिक्षणासाठी परिस्थिती हलाखीची असल्याने समस्या निर्माण झाली. त्यातच वडिलांचे छत्र हरपले. यावेळी शासकीय फार्मसी कॉलेज अमरावती येथे प्रवेश घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रवेशासाठी हातभार लावला. मात्र वर्षभर शैक्षणिक खर्चाचा प्रश्न समोर होता. यावेळी आईने कंबर कसून पुढील शिक्षणाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. व अनेक ठिकाणी भांडी, कपडे धुवून मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. 

अशा वेळी सुदर्शन ने देखील आईच्या कष्टाची जाणीव ठेवून ठाणे महानगरपालिका फार्मसी ऑफिसर म्हणून नोकरी मिळवली. मात्र, एवढ्यावरच न थांबता सुदर्शन ने नोकरीच्या चार वर्षा दरम्यान लहान बहिणीला पदव्युत्तर शिक्षणाचा हातभार लावून नोकरी मिळवून दिली, दुसरीकडे आपले शिक्षण सुरूच ठेवले. शासनाच्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागामध्ये औषधनिर्माण अधिकारी म्हणून सुदर्शन ची नुकतीच नियुक्ती झाली. त्याच्या यशाबद्दल आणि त्याच्या आईने घेतलेल्या कष्टांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments