प्राथमिक शाळा मोहेगाव येथे 'भारत टॅलेंट सर्च' परीक्षेत 'इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग'

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहेगाव येथे आज दि. २९ रोजी भारत टॅलेंट सर्च' Bharat Talent Search परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील स्पर्धात्मक बुद्धीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत मांडवड,मोहेगाव, टेंभी वस्ती लक्ष्मीनगर , पवार वस्ती वडाळी बु|| या ग्रामिण भागातील शेतकरी वर्गातील एकूण ११५ होतकरू विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.या परीक्षेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

ग्रामीण भागातील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा या परीक्षेचा मुख्य उद्देश होता. परीक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पेपर सोडवले. या परीक्षे मुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांचे स्वरूप कसे असते, याचा अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे मोहेगाव मधील नागरिकांनी आणि पालकांनी कौतुक केले.

ग्रामीण भागातील मुलांमधील टॅलेंट शोधण्यासाठी तालुक्याचे लाडके गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे ,शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ कांबरे,योगेश थोरात यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची ओढ लागली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याचे समजते. परीक्षेसाठी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक हिम्मत देशमुख, केंद्र समन्वयक साईनाथ महाडिक, संग्राम ढाकणे,नारायण उगले,राजु काकळीज, दिपक बागुल, सिताराम पिंगळे , विलास फेदरे,गोकुळ बोरसे,संजय नरोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

*प्रतिक्रिया* 

१)

  B.T.S सारख्या परीक्षांमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळते केवळ 115 मुलांपासून झालेली ही सुरुवात भविष्यात मोठी क्रांती घडवेल. पालकांनी विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे.

रविराज पाटील केंद्रप्रमुख

२)

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी मिळावी व परीक्षेचे महत्त्व समजावे यासाठी भारत टॅलेंट सर्च या परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते.परीक्षा पारदर्शक पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्र समन्वयक:- साईनाथ महाडिक

Post a Comment

0 Comments