येथील जनता विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालय नेहमी आघाडीवर असते, हीच परंपरा यंदा कायम राहिली आहे महाविद्यालयाच्या कला शाखेत मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. कला शाखेतून कु.रोशनी काकरवाल हिने 81.67% घेत प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु.आरती काटे हिने 76.83% घेत द्वितीय क्रमांक मिळविला तर कु. सुजाता वाघ हिने 74.67% घेत तृतीय क्रमांक मिळविला आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच मराठा विद्या प्रसारक नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे व माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष गोटू निकम तसेच उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत पाटील व जनता विद्यालयाचे प्राचार्य डी. वाय. चव्हाण तसेच कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. एस.आर पाटील. व प्रा. यु.ए. निकम तसेच श्रीम. प्रा.बी.आर.सोनवणे या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
|
0 Comments