Bay team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील वसंत नगर येथील श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित व्हि एन नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने आपली निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
राज्य शैक्षणिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी विज्ञान शाखेतून परिक्षेसाठी १७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्राविण्यासह सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
त्यात कौशल वाघ ८१.८३%, आविष्कार चौधरी ८१.५०%, अक्षय चौधरी आणि स्वराज चव्हाण ८०.००%, वैदेही जोशी ७९.६७%, रौनक जाधव ७९.३३% गुण मिळवून एक ते पाच क्रमांक मिळवून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले.
तर याच विद्यालयाच्या कला शाखेतून १२ वीच्या परिक्षेसाठी १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, अपवाद वगळता ९३.३३% निकाल लागला असून कु.पुजा धात्रक ७०.६७% ,कु. संजना राठोड ६९.३३%, कु. नेतल राठोड ६९.१७%, कु. क्रांती जाधव ६९.००%, आणि प्रकाश शिंदे ६६.६७% गुण मिळवून विद्यालयात प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एस. जी. राठोड, सचिव सिद्धार्थ राठोड, संचालक जे.जी. राठोड, व शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुण पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा .
0 Comments