Bay team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील साकोरा सारतळे शिवात जामधरी फाट्या जवळ विमलबाई बोरसे या ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील दागिने भामट्यांनी ओरबाडून नेले हि घटना खरी असली तरी फिर्यादी यांनी पोलिसात दिलेली फिर्याद व नोंद झालेली फिर्याद यात माञ काही प्रमाणात साम्य असले तरी घटना क्रम माञ वेगळा आहे.
सविस्तर वृत्त असे की, साकोरा सारतळे येथे शेतावर राहणारी महिला एकटे घर पाहून चोरांनी विमलबाई बोरसे दि १२ रोजी दुपारी २:३० वा एकटी महिला बघून तिघेजन दुचाकीवर आले आणी त्यांनी तुमच्यावडे बोकड, कोंबडा आहे का? अशी विचाराणा करताच सदर महिलेने नकार दिला मग भामट्यांनी पाणी पिण्याचा बहना केला असता सदर महिलेने घरातुन पाणी आणून दिले. एक चोरटा पाणी पित असताना दुसर्या चोरट्याने महिलेचे लक्ष वेधले व अंगावर झडप घालुन. हाताने फटके मारून महिलेला ओट्यावरुन खाली पाडले व अंगावरचे १२ ग्रांम सोनेची पोत ओरबडली कानातले दागिने ओरबाडत असताना महिलेने आरडा ओरडा केला असता भामटे दुचाकीवर पसार झाले. सदर महिला उदार निर्वाहासाठी काही दिवसा पूर्वी शेळी पालन करत होत्या तोच धागा पकडून चोरांनीसंधी साधली.या झटापटीत महिलेच्या अंगावर व डोक्याला किरकोळ दुखापत झाली, अशी फिर्याद दिली. मात्र पोलिसात झालेल्या नोंदीत तीन व्यक्ती सदर महिलेच्या घरी आले व म्हणाले तुम्ही एकटे राहता तुमच्या अंगावर दागिने आहे, ते काढून ठेवा आम्ही पोलीस आहोत.
असे सांगून महिलेच्या अंगावरील दागिने काढले व घरातुन काहीतरी आणा त्यात ते ठेवा असे सांगून महिलेची दिशाभुल करुन पोलिसाच्या भुमीकेतील चोरांनी तेथून मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला असे पोलीस नोंद दाखल झाली आहे.
घटनेचा तपास नांदगांव पोलीस घेत आहे .त्यात १२ ग्रँम सोन्याची पोत किमया ५० ह रु किमीतीचे दागिने पसार केले.पोलीस नोंद व तक्रारदार यांची फिर्याद यात माञ तफावत आहे. दरम्यान मागील काळात पोलीस असल्याची बतावनी करून शरात काही प्रमाणात चोर्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्या अनुशंगाने तर हि नोंद झाली असावी का?
0 Comments