वीज वितरण कंपनीने मानसून पूर्व कामे न केल्यास ठिय्या आंदोलन

 Bay team aavaj marathi

 मान्सून पूर्व कामांमध्ये अशा धोकादायक ठिकाणच्या तारा उंच करून त्याचप्रमाणे वीजरोहितच्या फ्युज बॉक्स बदलून दिले नाही. तर जातेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा इशारा.

विज वाहिन्या लोंबकळत असलेल्या ठिकाणी दाखवत असतांना संदीप सुर्यवंशी व शेतकरी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील महावितरण कंपनीच्या प्रशासनचा भोंगळ कारभारामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये s.t, L.t लाईनचे खांब वाकल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी दोन्ही खांबाच्या मध्ये जास्त अंतर असल्याने त्याचप्रमाणे विजेच्या खांबाला दिलेला तान (स्टे) तुटल्याने जमीन ओली झाल्याने हे खांब तिरकस झाल्याने विजेच्या तारा जातेगांव परिसरात जमिनीपासून सहा ते सात फुट उंचीवर आलेल्या असल्याने येणार्या खरीप हंगामात शेताची मशागत करतांना शेतकरी बांधवांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असून विज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी यांनी सर्व्हेक्षण करुन त्वरित विजेचा धक्का बसू शकतो अशा सर्व विज वाहिन्या उंच कराव्यात तसेच अनेक ठिकाणी विज रोहित्र असलेल्या खांबावर खालच्या बाजूला फ्युज बॉक्स पेटीतील फ्युज फुटलेले आहेत अशा सर्व धोकादायक असलेल्या विजवाहक वस्तू मान्सून पुर्व मेंटेनन्स कामे त्वरित पूर्ण करावीत असे आव्हान नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सुर्यवंशी यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात विज वाहिन्या लोंबकळत असलेल्या ठिकाणी शेतकर्या समावेत उभे राहून व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. 

तसेच मान्सून पूर्व कामांमध्ये अशा धोकादायक ठिकाणच्या तारा उंच करून त्याचप्रमाणे वीजरोहितच्या फ्युज बॉक्स बदलून दिले नाही. तर जातेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 




Post a Comment

0 Comments