नांदगाव डेपोची कन्नड जाणारी बस घाटात पडली बंद, तर दुसरी बस जातेगाव जवळ इंजिन गरम पडली बंद

 Bay team aavaj marathi 


परिवहन महामंडळाच्या विभागाचे नांदगाव आगार नाशिक जिल्ह्यात अर्निंग च्या बाबतीत अव्वल स्थानी असून देखील विविध कारणांमुळे बसेस बंद पडल्याने प्रवाशांना होणारा मनस्ताप नित्याचा झाला आहे. असाच प्रकार गुरुवार दिनांक २३ रोजी नांदगाव येथून कन्नड जाणार्या प्रवाशांसोबत झाला. M.H.२०. B.L- ०२१४ ह्या नंबर ची बस निर्धारित वेळेत कन्नड जाण्यासाठी निघाली मात्र ही बसचा कासारी जवळील चांदेश्वरी घाटात असलेल्या अवघड वळणावर गेअर बदलतांना क्लोज निकामी झाल्याने गेअर बदलणे शक्य नसल्याने नादुरुस्त झाली. 

गाडीचे इंजिन गरम झाल्याने रेडिएटर मध्ये पाणी टाकून थंड करतांना चालक वाहक आणि प्रवासी 

 या बस मध्ये महिला , पुरुष अबालवृद्ध असे सर्व २५ पेक्षा अधिक प्रवासी असल्याने गाडीच्या चालक/ वाहक यांनी नांदगाव बस स्थानकात फोन केला असता, प्रवाशांची पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी M.H.४० N- ८६११ ही दुसरी बस पाठवण्यात आली. परंतु दुसरी बसने देखील प्रवाशांना घेऊन पुढे दहा किलोमीटर अंतरावर येवून इंजिन गरम झाल्याने रेडिएटर मधिल सर्व coolant water बाहेर पडल्यामुळे बंद पडली. 

त्यामुळे गाडीतील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, गाडीच्या चालकाने सरदची बस ही हळूहळू जातेगांव बसस्थानकावर आणून उभी केली असता गाडीचे इंजिन आपोआप बंद पाडले, गावातील एका खासगी बोअरवेल चालू करुन मोठ्या प्रमाणात इंजिनवर आणि रेडिएटर मध्ये जवळपास पाण्याचा मारा करून इंजिन थंड झाल्यानंतर चालू करुन दुपारी जवळपास ३.३० वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

--------------------------------------------------------------

                          *चौकट*

 मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव आगारास ४७ बसेस उपलब्ध असुन त्यापैकी ९०% गाड्या ह्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या आहे. कित्येक वेळा नांदगाव आगाराच्या बसेस रस्त्यावर कोठे ना कोठे तरी बंद पडलेल्या बघायला मिळतात. तालुक्यातील या आगाराच्या बसेस पुणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, जालना, शेगांव यासह अनेक लांबच्या पल्याच्या ठिकाणी जातात सुदैवाने या बस आगारास उत्पन्न देखील चांगले आहे. परंतु दुर्दैवाने खटारा झालेल्या बसेस मुळे प्रवासी बांधवांना अनेक वेळा विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील कासारी हुण जातेगांव कडे जातांना चांदेश्वरी नावाचा तीन किलोमीटर अंतराचा अवघड वळणाचा घाट असून या घाटात चढ्याच्या ठिकाणी अनेकदा डिझेल अभावी, इंजिन गरम झाल्याने तसेच ब्रेक न लागल्याने चालकाच्या सतर्कतेने गाडी दरडीला अडकल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या आगारातील जवळपास सर्वच बसेस चे लाईट देखील रस्त्यावर चांगले पडत नाही, गाडीच्या खिडक्यांचा व इतर पत्र्यांचा मोठा आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, गाडीचे मशिन चालू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात होणारे वायुप्रदूषण हे नित्याचे झाले आहे. हा सर्व त्रास ना इलाजास्तव प्रवासी बांधवांना पैसे मोजून सहन करावा लागत आहे.

-----------------------------------------------------------------

आ.कांदे यांनी लक्ष देणे आवश्यक 
 
नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे निकटवर्तीय आ. सुहास अण्णा कांदे यांनी तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी मनमाड येथील पाण्याचा यक्ष प्रश्न मार्गी लावला यासह विविध विकासकामांचे धडाका लावला परंतु जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ( एस टी ) परिवहन महामंडळाच्या नांदगाव आणि मनमाड येथील आगाराच्या जुनाट खटारा झालेल्या सर्व बसेस बदलून आणि दोन्ही ही बसस्थानकावर असलेले स्वच्छता गृह बांधकाम करणे आणि बसस्थानकास किमान रंगरंगोटी करणे बसस्थानक परिसरातील इतर प्रश्न मार्गी लावावेत अशी प्रवासी बांधवांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments