Bay team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव
भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून दि. २३ रोजी नांदगाव ते चाळीसगाव रस्त्यावर पानेवाडी गॅस प्रकल्पातून गॅस सिलेंडर घेऊन चाळीसगाव च्या दिशेने भरधाव वेगाने जानार्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला अपघात ग्रस्त होऊन पलटी झाला. सुदैवाने प्राण हाणी झाली नाही चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून बालबाल बचावला हि घटना नांदगांव नजीक ४० गांव रोडवर गिरणा काॅलणीजवळ घडली.
.jpg)
भरगाव वेगाने गॅस सिलेंडर घेऊन जाणारा अपघातग्रस्त ट्रक
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पानेवाडी येथून एच पी गॅस प्रकल्पातून १६० घरगुती वापरासाठीचे गॅस सिलेंडर भरलेला ट्रक चालक वना उत्तम मोरे रा. चाळीसगाव ग्रामीण हे पानेवाडी (मनमाड) येथून चाळीसगाव कडे घेऊन जात असताना मध्यराञी १ च्या सुमारास त्यांचा गाडीवरील अचानक ताबा सुटल्यानॆ ट्रक गिरणा काॅलणी जवळ रोडच्या बाजूला फुटपाथवर घसरत जाऊन पलटी झाला यावेळी गाडीतील डिझेल टँक लिकीज होऊन गळती झाली.या दरम्यान चालक कसाबसा वाचला त्याच्या डोक्याला व अंगाला मार लागुन दुखापत झाली दि २३ रोजी सकाळी गॅस सिलेंडर दुसर्या गाडीत भरून रवाना करण्यात आले या घटनेमुळे गाडीचे व फुटपाथचे मोठे नुकसान झाले .
.jpg)
0 Comments