टंचाई च्या काळात जातेगांव आणि चंदणपूरी येथील पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन मधून पाणी चोरी आंदोलन छेडण्याचा इशार्या नंतर उशिरा गुन्हा दाखल करणेसाठी अर्ज

 Bay team aavaj marathi 


नांदगाव तालुक्यातील जातेगाव गृप ग्रामपालीके अंतर्गत असलेल्या चंदणपूरी येथील पाणी पुरवठा योजनेच्या एअर वाल नट खोलून त्यातून सटवाई तलावाच्या बाजूला असलेल्या शेतकरी सुरेश शंकर चव्हाण यांनी त्यांच्या शेतातून गेलेल्या मुख्य जलवाहिनी मधून पाणी लिकेज करुन तेथे १४ पाईप जोडून स्वतः मालकीच्या विहिरीत टाकून पाणी चोरी करत असलेबाबत ग्रामपालिकेने माजी सरपंच संतोष डांगे,मधुकर निंबारे,अंकुश चव्हाण,साईनाथ चव्हाण,रावसाहेब जाधव,सुरेश जाधव,संजय चव्हाण यांच्या समक्ष प्रत्यक्ष पाहाणी करून शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी आठ वाजता पंचनामा केला. व अनाधिकृत पने ग्रामपालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आलेले १४ पाईप जप्त करून ग्रामपालिका कार्यालयात आणण्यात आले.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील जुन्या आणि नविन जलजिवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरींने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.

परिसरातील सर्व विहिरी कोरड्या ठाक पडल्याने चंदणपूरी गावांसाठी येथील सटवाई तलावात नविन जलजिवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरीत साधारण एक महिन्यापासून दररोज दोन टॅंकर पाणी टाकून तेथुन तीन किलोमीटर चंदणपूरी गावातील पिण्याच्या टाकीत टाकून नळपाणी पुरवठा योजनेद्वारे वितरण करण्यात येत होते. पाणी पुरवठा सुरळीत सुरू असतांनाच दोन -तीन दिवसांपासून अचानक पाण्याच्या टाकीत पाणी का येत नाही म्हणून, येथील पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी पाहाणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला.



येथील नागरिकांनी पाणी चोरी प्रकरणात आंदोलन छेडण्याचा इशार्या दिल्यानंतर सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करणेसाठी सरपंच शांताबाई चांगदेव पवार आणि ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांनी पोलिस ठाण्यात सुरेश शंकर चव्हाण यांचेवर पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करणेसाठी अर्ज दाखल केला.



तर दुसर्या एका घटनेत जातेगांव येथे देखील पाणी टंचाई असून भारत निर्माण जल जीवन मिशन आणि इतर वेगवेगळ्या योजनेअंतर्गत खोदलेल्या सर्व विहिरी कोरड्या टाकल्यामुळे गावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत रहावा यासाठी परिसरातील काही विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून अधिग्रहित केलेल्या एका विहिरीचे पाणी येथील भारत निर्माण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी पासूनच्या मुख्य जलवाहिनी ला जोडून गावातील पाण्याच्या टाकीत काही दिवसांपूर्वी आणले होते. त्यामुख्य जलवाहिनीतुन देखील एका नागरिकाने विनापरवाना पाणी घेतले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.



Post a Comment

0 Comments