नांदगांव तालुक्यात सकाळच्या सञात १० वाजेपर्यंत १५ ते २०% मतदान विविध केंद्रावर नांदगांव शहरात झाले .काही मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने काही वेळ मतदाराना थांबावे लागले नंतर ते सुरळीत झाले. या प्रसंगी जागरुक व ज्येष्टांचा समावेश अधिक होता, कडक उन्हात मतदार मतदानासाठी येत होते. फुलेनगर येथे भारताची मेडिकल इन्सुरंन्स निवाभुपा कंपनीची ब्रँड अंबेशटर योगिता जगधने यांनी आपल्या परिवरासह मतदानाचा हक्क बजावला व इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
नांदगाव येथे मतदान करण्यासाठी मतदारांनी केलेली गर्दी
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी दिंडोरी लोकसभा मतदार संघात सुरवात चांगली झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १९.५ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजे. पर्यंत ३३.२५ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.९५ टक्के मतदान झाले. दिंडोरीत लोकसभेत सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी नांदगाव ४१.८८, कळवण ५३.८४, चांदवड ४७.५७, येवला ४०.६७, निफाड ४४.३७, दिंडोरी ४८.०२ टक्के मतदान झाले आहे.सायंकाळ पर्यंत 61.97% इतके मतदान झाले.
0 Comments