Bay team aavaj marathi
भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव
लोकसभेच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दि 20 रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर सरासरी 57.12% इतके मतदान झाले.
ढेकू येथील मतदार केंद्रावर दुपारी असलेला शुकशुकाट

ढेकू येथील मतदार केंद्रावर दुपारी असलेला शुकशुकाट
सकाळ पासूनच संथगतीने मतदानास सुरुवात झाली होती, जातेगांव येथे दहा वाजेच्या दरम्यान हळूहळू मतदार स्वयंस्फूर्ती मतदानासाठी येऊ लागले असता, अनेक मतदारांची नावे शोधून सुद्धा मतदान यादीत सापडली नसल्याने, सुमारे 30 ते 35 मतदार मतदानापासून वंचित राहिले असल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला. याबाबत येथील विकास सोसायटीचे संचालक नाना त्र्यंबक थोरात, प्रमिला गिरजीनाथ भागवत, केसरबाई बाबुराव जुंधरे यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वरील तीघांचे नाव मतदार यादीत सापडली नसल्याने खंत व्यक्त करत हताश होऊन घरी परतले.
जातेंगाव येथील मतदार केंद्रावर पाच वाजेच्या नंतर झालेली मतदारांची गर्दी

0 Comments