नांदगांव वेहळगांव रस्त्यावर झाड पडून झाले अकरा दिवस बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव 


 दि. ५ मे रोजी आकार दिवसांपूर्वी नांदगांव तालुक्यात प्रचंड वादळ वारा आणी गारांचा पाऊस झाला या वादळात रस्त्यावर आनेक झाडे कोसळली जि झाडे तोडून घेऊन जाण्या जोगी होती अशी अनेक झाडांचा फांद्या स्थानिक रहिवाशांनी तोडून घेऊन नेले, परंतु जि झाडे मोठी व निरमनुष्य ठिकाणी आहेत अशी झाडे आजुन ही रस्त्यावर पडून आहेत नांदगांव वेहळगांव रोडवर सारताळे निमतळे शिवारात एक मोठे बाभळिचे झाड रस्त्यावर आडवे पडले आहे ते रहदारीला अडथळा होत आहे या रस्त्यावरआडवे पडलेल्या झाडामुळे अपघाताची दाट शक्यात आहे.

झाड पडून ११ दिवस झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगांव वेहळगांव हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनांची वाहतूक अधिक असते पण सारताळे निमतळे या ठिकाणी रस्त्यावर आडवे पडलेले बाभळीचे झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही .ते आता रहदारीला अडथळा होत आहे १२ दिवस झाले पण आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग न आल्याने झाड रस्त्यावर आडवे पडून आहे. दुचाकी वगळता इतर सर्वच चारचाकी व अवजड वाहनांना हे झाड अडसर ठरत आहे, राञीच्या वेळेला आनेक जन झाडावर जाऊन आदळतात यातुन मोठा अपघात होण्याची शक्यात आहे ? या मार्गावर वेहळगांव, तळवाडे साकोरा, मुळडोंगरी, जामधरी कळदरी, गिरणाडँम, मगळगांव, पिलखोड, पळाशि,सावरगांव, आदी गावांचा समावेश आहे .दरम्यान याच मार्गावर नांदगांव रेल्वेमाल धक्या जवकल एक मोठे झाड वादळात पडले होते ते स्थानीकानी फांद्या तोडून घेउन गेले. तसेच उड्डान पुलाजवळ व मोरखडी बंधार्या जवळ वेहळगाव रस्त्यावर आडवे पडलेले झाड तुकाराम सोनवने या रहिवाशांनी बाभळीचे आडवे पडलेले झाड तोडून बाजूने केले व रहदारीला रस्ता मोकळा केला. परंतु निमतळे सारतळे लगत पडलेले झाड आजुन तसेच रस्त्यावर पडून आहे .


 ५ मे रोजी आकरा दिवसांपूर्वी नांदगांव वेहळगांव रोडवर पडलेले झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही यामुळे अपघातात होईल तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का राजेंद्र सावंत शेतकरी सावरगांव

Post a Comment

0 Comments