EVM मशीनवर महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे यांची निशाणी अस्पष्ट असल्याने हरकत दाखल

 Bay team aavaj marathi 

EVM मशीनवर महाविकास आघाडीच्या उमेदवार भगरे यांचे नाव आणि निशाणी अस्पष्ट असल्याने नांदगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आक्षेप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ च्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाती नांदगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११३ येथे दि.१६. मे रोजी नांदगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत स्ट्रॉंगरुम EVM मशीनचे candidate setting आणि sealing कामकाज घेण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन सेटिंग प्रसंगी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपर वर महाविकास अघाडी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा निवडणूकीसाठी असलेले


 उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांची अधिकृत असलेले निवडणूक चिन्ह (निशाणी) तुतारी वाजविणारा माणूस ठळकपणे दिसून येत नाही.

 महाविकास आघाडीच्या वतीने तहसिलदार तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे हरकत नोंदवतांना महेंद्र बोरसे, संतोष गुप्ता व हरेश्र्वर सुर्वे

पुसट अथवा न दिसणाऱ्या निशाणी निवडणूक चिन्हामुळे मतदार संघात संभ्रम निर्माण होणार असून हे पारदर्शक निवडणुकीच्या समन्यायी तत्वाला बाधक असल्याने, या निवडणुकीत उभ्या असलेल्या इतर उमेदवारांप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांचे नाव आणि त्यांच्यासमोर त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हे निर्धारित साईज मध्ये ठळकपणे या बाबत आक्षेप घेत, वरील प्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी. 

याबाबत चे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तसेच तहसीलदार नांदगाव यांना महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जेष्ठ नेते संतोष गुप्ता आणि कॉग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांनी नांदगावचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे (हरकत) तक्रार आज गुरुवार दिनांक १६ रोजी दाखल केली.





Post a Comment

0 Comments