नांदगांव ४० गांव रोडवर गंगाधरी येथे मनमाड डेपोची बस आणी अल्टो कार या मध्ये अपघात झाला असता त्यात दोन महिला व एक पुरूषाचा मृत्यु झाला आहे. कार मधील हे नाशिकचे रहिवाशी आहेत. या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नॅशनल हायवे ७५३ वरील अपघाताचे प्रमाण वाढते प्रमाण लक्षात घेता चिंता व्यक्त केली आहे.
नांदगाव शहरातील छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर गंगाधरी जवळ एसटी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली असुन या अपघातात एक २ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला असुन त्याल पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ सर्व नियोजित प्रोग्राम स्थगिती करुन घटनास्थळी भेट देऊन सहकार्य केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव एसटी क्रमांक एम एच १४ बीटी ४४९८ व अल्टो गाडी एम एच १५ सीडी२०५७ ही ४० गावहुन मनमाड येत होती दि १४ रोजी सकाळी सुमारे ११ वा दरम्यान बस व कार चा समोरासमोर अपघात झाला या अपघातात अल्टो कारमधील दोन महिला एक पुरुषाचा मयत हे ३० ते ४० वयोगटातील होते यांचा मृत्यू झाला.
या कारमधील दोन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात येत आहे.दरम्यान बसचे वाढते अपघात प्रवाशांना चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान मागील महिण्यात नांदगांव तालुक्यात बस च्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला असून दि १४ रोजी बस कार अपघतात ३ जनांचा मृत्यु झाला आहे. या अपघतात कारचा चक्कचुर झाला आहे. घटना स्थळी नांदगांव पोलिसानी देखील धाव घेत पंचनामा करुन रहदारी सुरळीत केली तपास पो नि प्रितम चौधरी व सहकारी करीत आहे .
0 Comments