यवतमाळ येथील पथकाला पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील एका शेतात असलेल्या फॉर्म हाऊसमध्ये लपुन छपुन पत्ता जुगारीचा खेळ सुरु असल्याची पोलीसांना विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्था.गु.शा. कडील पथकांना अवैध धंद्याची गोपणीय माहिती काढुन कारवाई करणेबाबत च्या सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने अगदी थोड्या कालावधीत उमरखेड पोलीस ठाणे हद्दीतील घटनास्थळावर पोहचून गोपणीय माहिती प्रमाणे जुगार अड्ड्यावर शुक्रवार १७ एप्रिल सायंकाळच्या सुमारास धाड मारून तेथे जुगार खेळत असलेल्या १६ जुगाऱ्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेत १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विश्वसनीय मिळालेल्या माहिती नुसार या कारवाई दरम्यान काही इसम पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेले तर आरोपी पैकी १) सुरज जोगींदर गुप्ता वय ३५ वर्ष, रा. बाळदी ता. उमरखेड, २) नितेश क्रिष्णा राठोड वय २६ रा. दत्तबर्डी ता. हादगांव जिल्हा नांदेड, ३) ग्यानबा किसन चिकणे वय २९ रा. टेंभी ता. महागांव जि. यवतमाळ, ४) टिकाराम उमाजी चव्हाण वय ३८ रा. दत्तबडी ता. हादगांव जिल्हा नांदेड ५) सय्यद रसुल सय्यद मुसा वय ५१ रा. रोहीलेपुरा उमरखेड, ६) संतोष सुर्यभान जोगदंड वय ४० रा. चिलगव्हाण ता. उमरखेड, ७) मनोहर दत्तराव जाधव वय ३९ रा. पोळी ता. हदगांव जि. नांदेड, ८) से. सोहल अली वय ३२ रा. तिवरठा ता. जि. नांदेड, ९) सै. पाशु से. रहिमोडीन वय २८ रा. देगलुर फाटा नांदेड ता.जि. नांदेड, १०) शिवाजी केशवराव कदम वय ३७ रा. वैसा ता. जि. नांदेड, ११) अशोक नारायण शिंदे वय २४ रा. मिरकस वाडी ता. मुदखेड जि. नांदेड, १२) शेख शहबाज शेख रफीक वय ३६ रा. खडकपुरा ता.जि. नांदेड, १३) शेख रमजान शेख फरीद वय ३२ रा. राजेंद्रप्रसाद वार्ड उमरखेड, १४) शेख बादशहा शेख हुसेन वय ६० रा. राणी धानोरा ता. आर्णी जि. यवतमाळ, १५) नारायण भिमराव चव्हाण वय ४५ रा. हिंगोली नाका तान्हाजी नगर नांदेड ता.जि. नांदेड, १६) शरद भारत राठोड वय ४० रा. ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ असे एकुण १६ इसम मोक्यावर मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे जवळून रोख रक्कम ८,०२,०४०/- रोख रक्कम व १० मोबाईल कि. अं. ६५ हजार रु, आणि एकुण ०८ मोटार सायकल किमंत १ लाख २० हजार रु असा एकूण ९ लाख ८७ हजार ०४०/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन संशयित आरोपी विरुध्द उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
वरील नमूद सर्व मुद्देमाल व आरोपींना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यवतमाळ, स.पोनि पवन राठोड, धिरज बांडे, पो.उपनि गजानन राजमल्लु, शरद लोहकरे व पथकातील पोलीस अंमलदार सर्व स्था.गु.शा. यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments