फिरायला गेलेल्या शिक्षकांची व्हॅन दरीत कोसळली ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू ,सहल जीवावर बेतली!

 Bay- team aavaj marathi 

शाळेला सुट्टी पडल्यानं शिक्षकांचा ग्रुप सहलीला गेला होता. धबधबा पाहून परतताना त्यांच्या व्हॅन ला भीषण अपघात झाला. यामध्ये ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तमिळनाडूतील वालपराईत पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात चक्काचूर झालेली हॅन

केरळमधील एका शाळेचे शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा ग्रुप कुटुंबियांसमवेत पर्यटनासाठी तामिळनाडू ला गेला होता. त्यांनी आधी अथिरापल्ली चा धबधबा पाहिला. यानंतर ते वालपराई ला रवाना झाले होते. याच दरम्यान त्यांच्या व्हॅनला अपघात झाला. कोईम्बतूर जिल्ह्यात असलेल्या वेलपराईच्या डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. व्हॅन मधील सगळे जण केरळच्या मल्लपुरम भागाचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपराई - पोल्लाची हिल रोड जवळ एका वळणावर चालकाचं व्हॅन वरील नियंत्रण सुटल्याने. गाडीने बॅरियरला धडक दिली. मग ती खोल दरीत कोसळली. अपघात अतिशय भीषण होता. या अपघातात व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकानं रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या अपघातात चालकासह अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दुर्घटना स्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु करुन जखमींना पोल्लाची सरकारी रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. यातील काही मलप्पुरमच्या शाळेत अध्यापनाचं काम करायचे. शाळेला सुट्टी असल्यानं ते तामिळनाडू ला फिरायला गेले होते.

अपघाताबद्दल समजताच शाळेत पालकांची आणि स्थानिकांची गर्दी जमली. एकूण १६ जण फिरायला गेल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात केरल पोलीस तमिळनाडू पोलिसांच्या संपर्कात आहेत. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. तसेच केरळचे मुख्यमंत्र्यांनीही अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत 'हा अपघात अतिशय दु:खद आहे. जखमींवर योग्य उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments