तेलंगणा चे गुम्मडी नरसय्या पाच वेळा आमदार परंतु आजही आपल्या जुन्या सायकल वर फिरतात

 Bay- team aavaj marathi 

आजच्या काळात एकदा नगरसेवक झाले तरी लोकांच्या गाड्या आणि राहणीमान बदलतं. पण ५ वेळा आमदार राहिलेले गुम्मडी नरसय्या आजही एका सामान्य माणसासारखं जीवन जगत आहेत. राजकारणाकडे 'सेवा' म्हणून पाहणारा हा माणूस आजच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांचे नाव गुम्मडी नरसय्या त्यांनी तेलंगणातील 'येल्लांदू' मतदारसंघातून तब्बल ५ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे.

एवढ्या मोठ्या पदावर राहूनही त्यांनी कधी स्वतःसाठी संपत्ती जमा केली नाही. आजही ते कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या जुन्या सायकलवरून प्रवास करतात. राजकारणातील चकाचौंध आणि बडेजावपणा पासून दूर, ते आजही आपल्या मूळ गावात साधेपणाने राहतात. त्यांना कोणत्याही सुरक्षेची किंवा लवाजम्याची गरज भासत नाही.

आदिवासींचा आवाज: त्यांनी आयुष्यभर गोरगरीब आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांच्यासाठी राजकारण हा पैसा कमावण्याचा धंदा नव्हता, तर समाजाची सेवा करण्याचं साधन होतं. पद येतं आणि जातं, पण जी माणसं आपली जमीन विसरत नाहीत, तीच लोकांच्या मनावर राज्य करतात. गुम्मडी नरसय्या सारखे नेते हीच लोकशाहीची खरी ताकद आहेत.

 "आजच्या 'लक्झरी' राजकारणाच्या युगात गुम्मडी नरसय्या यांचा हा साधेपणा तुम्हाला कसा वाटला? आपल्या देशाला अशा नेत्यांची गरज आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा!" 



Post a Comment

0 Comments